Belagav Gokak Case
esakal
बेळगाव : बहिणीची छेडछाड आणि तिच्याशी संपर्क वाढविल्याच्या संशयावरून गोकाक तालुक्यातील राजापूर या गावातील २३ वर्षीय युवकाच्या डोक्यात काठी आणि लोखंडी रॉडने हल्ला (Belagav Gokak Case) करून निर्घृण खून केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (ता. १९) पहाटे घडली. मंजुनाथ सुभाष एन्नी (वय २३, रा. राजापूर, ता. गोकाक) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, तरुणाच्या खूनप्रकरणी अल्पवयीन युवकावर घटप्रभा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.