Maharashtra Ekikaran Samiti
esakal
बेळगाव (कर्नाटक) : महामेळावा घेण्यासाठी तोंडी परवानगी देण्यात आल्यानंतर देखील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे (Maharashtra Ekikaran Samiti) आयोजित करण्यात आलेला महामेळावा रोखण्यासाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवून आणि दडपशाही करीत समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे व्हॅक्सिन डेपो परिसर आणि दुसरे रेल्वे गेट येथे सोमवारी (ता. ८) तणावाची परिस्थिती निर्माण झाली.