Belgaum Crime News
esakal
देश
चॉकलेटचं आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार, ती रडू लागताच गळा दाबून केला खून; नराधमाला फाशीची शिक्षा अन् 10 लाखांचा दंड
Belagavi POCSO court delivers historic judgment : भरतेश याने बालिकेला घरी घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केले. यावेळी ती रडू लागली.
बेळगाव : रायबाग तालुक्यातील एका गावामध्ये २०१९ मध्ये घडलेल्या बालिकेवर अत्याचार करून खून प्रकरणी विशेष जिल्हा पोक्सो न्यायालयात (Belgaum POCSO Court) शुक्रवारी (ता. २६) दोषी आरोपीला फाशीची शिक्षा आणि १० लाख रुपयांचा दंड ठोठाविला. भरतेश रावसाहेब मिर्जी (वय २८) असे फाशीची शिक्षा झालेल्या त्या आरोपीचे नाव आहे.
