Belagav Crime
esakal
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हिरेमुळंगी गावात हृदयद्रावक घटना काल (ता. २५) उघडकीस आली. मुलगी जन्माला आल्याच्या रागातून स्वतःच्या तीन दिवसांच्या नवजात बालिकेचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार (Belagav Crime) समोर आला आहे. खून करणारी आई अश्विनी हळकत्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, तिच्याविरुद्ध सुरेबान पोलिस ठाण्यात (Sureban Police Station) खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.