Belagav Crime News
esakal
बेळगाव : अनैतिक संबंधाच्या संशयावरून उफाळलेल्या रागातून एकाचा निर्घृण खून (Belagav Crime News) केल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील हुलिकट्टी गावात सोमवारी (ता. २) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. बसवराज परप्पा होसमणी (वय ४९, बसिडोणी, ता. सौंदत्ती) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर याप्रकरणी संशयित इरय्या संगय्या मठपती (वय ३२, रा. बसिडोणी, ता. सौंदत्ती) याच्याविरुद्ध खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे.