Bullock Race New Rules : बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी; 18 अटींची पूर्तता तपासणार समिती; जिल्हाधिकारी घेणार अंतिम निर्णय!

Belagavi bullock race new rules : बेळगावमध्ये बैलगाडी शर्यत आयोजित करण्यासाठी १५ दिवस आधी अर्ज करणे आवश्यक असून, १८ अटींची पूर्तता तपासून तालुकास्तरीय समिती जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करणार आहे.
bullock race permission from district collector Belagavi

bullock race permission from district collector Belagavi

esakal

Updated on

बेळगाव : बैलांची शर्यत, बैलगाडी शर्यत किंवा अन्य पारंपरिक क्रीडा स्पर्धा आयोजित करायची असल्यास आता तालुकास्तरीय समितीची शिफारस आवश्यक राहणार (Belagavi bullock cart race permission rules) आहे. आयोजकांना किमान १५ दिवस आधी तहसीलदारांकडे अर्ज करावा लागेल. समिती अर्जाची छाननी करून १८ अटींची पूर्तता, प्राण्यांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेची स्थिती तपासल्यानंतरच जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करणार आहे. मात्र, समितीची शिफारस म्हणजे परवानगी नसून, अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com