Belagavi House Theft Case Gold Jewelry Robbery
esakal
बेळगाव : भारतनगर, लक्ष्मी गल्ली परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी लाखोंचे दागिने पळवल्याची घटना गुरुवारी (ता. २) उघडकीस आली आहे. घरमालक चार ते पाच दिवसांपासून परगावी (Belagavi Theft Case) गेले होते. यादरम्यान तिजोरी फोडून दागिने आणि किमती वस्तू चोरट्यांनी पळविल्या आहेत. घरफोडीची गुरुवारी (ता. २) रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती. मात्र, घरमालकांना याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी तिजोरीतून सुमारे ८० ते ९० तोळे दागिन्यांची चोरी झाल्याचे म्हटले आहे.