Kapileshwar Tank Wall Collapse : कपिलतीर्थ तलावाची भिंत कोसळून दोन निष्पाप मुलांचा बुडून दुर्दैवी अंत; कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटणारा

Tragic Wall Collapse at Kapileshwar Tank in Belagavi : बेळगावातील कपिलतीर्थ तलावाची भिंत कोसळून दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.
Belagavi Kapileshwar tank wall collapse incident

Belagavi Kapileshwar tank wall collapse incident

esakal

Updated on

बेळगाव : कपिलेश्वर मंदिर परिसरातील कपिलतीर्थ तलावाची संरक्षण भिंत रविवारी सकाळी कोसळून दोन निष्पाप मुलांचा बुडून मृत्यू झाला. शिवम परशुराम सुंडीकर (वय ७, रा. जेड गल्ली, शहापूर, बेळगाव) आणि परशुराम राजू निलजकर (११, रा. पाचवा क्रॉस, शिवाजीनगर, बेळगाव) अशी त्यांची नावे (Belagavi Kapileshwar tank wall collapse incident) आहेत. घटनास्थळी दिवसभर लोकांनी गर्दी होती. कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com