Belagavi SIR FIR against Ravi Patil
esakal
बेळगाव : विशेष मतदार यादी पुनरिक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान बेळगाव उत्तर मतदारसंघातील १९८ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी बनावट कागदपत्रे व चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी भाजप नेते डॉ. रवी पाटील यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध मार्केट पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १) गुन्हा दाखल केला (Belagavi SIR FIR against Ravi Patil) आहे. शंकर बिराप्पा नाईक, प्रशांत दीपक मुंदिनमन (मुद्दीनमन) आणि डॉ. रवी पाटील अशी एफआयआरमध्ये नमूद केलेल्या प्रमुख संशयित आरोपींची नावे आहेत.