Karnataka new onion price in Belgaum market
esakal
बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) कांद्याच्या दरात मागील बाजाराच्या तुलनेत प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील जुना कांदा आणि कर्नाटकातील नवीन कांद्याची बाजारात मोठी आवक झाली (Belgaum onion market rate per quintal) आहे. महाराष्ट्रातील जुन्या कांद्याच्या चार, कर्नाटकातील नवीन कांद्याच्या २८०, तर कर्नाटकातील जुन्या कांद्याच्या पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. कांद्याची आवक असतानाही दरात वाढ झाल्याने बाजारातील व्यवहारांना चांगली चालना मिळाली आहे.