Shivaji Maharaj Dispute
esakal
बेळगाव : दरवेळी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Shivaji Maharaj Dispute) चुकीचे वक्तव्य करून अपमान करण्याचा प्रयत्न कन्नडिगांकडून सातत्याने केला जात असून, रविवारी कन्नड साहित्य भवन (Kannada Sahitya Bhavan) येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात रा. चिं. ढेरे यांच्या साहित्याचा चुकीचा संदर्भ देत साहित्यिक वाय. आर. पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे मराठी भाषिक आणि मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.