
बेळगाव: बेळगावातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने बेळगाव शहर हादरले आहे.