Central Railway : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' तीन एक्स्प्रेस रेल्वे दहा दिवस राहणार बंद, काय आहे कारण?

मध्य रेल्वेतर्फे कोल्हापूर-मिरज व पुणेदरम्यान अनेक रेल्वे (Railway) गाड्या रद्द केल्या आहेत.
Central Railway
Central Railwayesakal
Summary

दहा दिवस दोन्ही जलद गाड्या बंद होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

रायबाग : मिरज व सांगली या ठिकाणी दुहेरीकरण झाल्याने ते जोडण्याकरिता मध्य रेल्वेतर्फे कोल्हापूर-मिरज व पुणेदरम्यान अनेक रेल्वे (Railway) गाड्या रद्द केल्या आहेत. तर काही अन्य मार्गाने वळविल्या आहेत. त्या कामकरिताच मिरज-बेळगावदरम्यान धावणाऱ्या दोन जलद गाड्या बेळगावपर्यंत धावणार असल्याने कुडची, उगार, रायबाग, घटप्रभा, गोकाकसह अन्य प्रवाशांना त्रास होणार आहे.

सोमवार ता. २५ डिसेंबर २०२३ ते ५ जानेवारी २०२४ पर्यंत गाडी क्रमांक १७४१५ तिरुपती-कोल्हापूर ही रेल्वे बेळगावपर्यंतच धावणार आहे. गाडी क्रमांक १६५८९ बंगळूर-मिरजला जाणारी राणी चन्नमा एक्स्प्रेस ही रेल्वे मिरजेपर्यंत न जाता बेळगावपर्यंत धावणार आहे.

Central Railway
Kolhapur Politics : पालकमंत्र्यांना मागे बसवून महाडिकांची 'बुलेट सवारी'; मुश्रीफ म्हणाले, 'मुन्ना'च्या पाठीशी मी..

२६ डिसेंबर २०२३ ते ६ जानेवारी २०२४ पर्यंत गाडी क्रमांक १७४१६ कोल्हापूर-तिरुपती व गाडी क्रमांक १६५९० मिरज-बंगळूर जाणाऱ्या या दोन्ही गाड्या बेळगाव रेल्वे स्थानकातून निघणार आहेत. दहा दिवस दोन्ही जलद गाड्या बंद होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

कुडची, उगार, रायबाग, घटप्रभा, गोकाकसह अन्य स्थानकांतील प्रवाशांचीही गैरसोय होणार आहे. तिरुपती व बंगळूरला जाणाऱ्या प्रवाशांना बेळगावातून गाडी पकडावी लागणार आहे. बेळगावपर्यंत प्रवाशांना जाण्याकरिता खालगी वाहन अथवा बसने प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे वेळही जास्त वाया जाणार आहे.

Central Railway
Congress Government : कर्जमाफीसाठीच शेतकऱ्यांना राज्यात दुष्काळ हवा असतो; मंत्री पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य

महिला, लहान मुले व रुग्णांना मोठा त्रास होणार आहे. त्यासाठी रेल्वे विभागाने या दोन्ही गाड्या कुडची अथवा उगारपर्यंत आणल्यास या भागातील प्रवाशांची सोय होणार आहे. विशेषतः बंगळूरकडे जाणारे प्रवासी या भागातून जास्त प्रवास करतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com