बेळगाव एपीएमसी बाजार मतदानामुळे शनिवार एेवजी रविवारी

नागेंद्र गवंडी
मंगळवार, 8 मे 2018

बेळगाव - आठवड्यातील शनिवारी आणि बुधवार हे दोन दिवस एपीएमसीमध्ये बाजार भरतो. पण, शनिवारी (ता.12) एपीएमसीचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय बेळगाव एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. शनिवार ऐवजी रविवारी (ता.13) व्यापार होणार आहे.

बेळगाव - आठवड्यातील शनिवारी आणि बुधवार हे दोन दिवस एपीएमसीमध्ये बाजार भरतो. पण, शनिवारी (ता.12) एपीएमसीचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय बेळगाव एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. शनिवार ऐवजी रविवारी (ता.13) व्यापार होणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी याची नोंद घेण्याची गरज आहे. व्यापाऱ्यांकडून गावपातळीवर मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्याचाही निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा दोन दिवसानंतर थंडावणार आहेत. तर मतदाराच्या घरोघरी जाऊन गाठी भेटी घेता येणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. एपीएमसीचा बाजाराचा मुख्य दिवस म्हणून शनिवार आहे. शनिवारी शेतीमालाचा लिलाव केला जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांची गर्दी असते. पण, या दिवशी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होत आहे. तेंव्हा या दिवशी एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

आपला व्यवसाय बंद ठेवून प्रत्येकजण आपल्या गावामध्ये मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. आठवड्यातील शनिवार आणि बुधवार असे दोन दिवस शेती मालाचा लिलाव केला जातो. पण, यावेळी शनिवारी मतदानाचा दिवस आहे. त्यामुळे बुधवार ते बुधवार असे होणार असून शेतकऱ्यांना मोठी अडचण होऊ शकते. तेव्हा शेतकऱ्यांना सोयीसाठी म्हणून व्यापाऱ्यांनी रविवारी (ता.13) बाजार भरविण्यात येणार आहे.

अधिकृत उमेदवाराला पाठिंबा

बेळगाव एपीएमसीमध्ये सर्वाधिक मराठी भाषिक व्यापारी आहेत. तेव्हा येथील सर्व एपीएमसीच्या व्यापाऱ्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. तेव्हा या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी व्यापाऱ्यांनी कार्यरत झाले आहे.

एपीएमसीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन बुथ आहेत. तेव्हा याठिकाणी लोकांची ये-जा होत राहणार आहे. तेव्हा एपीएमसीने शनिवारी (ता.12) बाजार बंद ठेवण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी शनिवारी व्यापार बंद ठेवून रविवारी (ता.13) सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

एम. बी. मुंगारी
माजी सदस्य एपीएमसी

Web Title: Belgaum News APMC Market on sunday