कन्नड संघटनांकडून मराठी फलकांना काळे फासण्याचा प्रकार

विनायक जाधव 
शुक्रवार, 4 मे 2018

बेळगाव - सीमाभागात मराठी भाषेतील फलक पुन्हा टार्गेट होऊ लागले आहेत. मराठी भाषिक एकीची वज्रमुठ आवळत असतानाच कन्नड संघटनांकडून मराठी फलकांना काळे फासण्याचा प्रकार निलजी (ता. बेळगाव) येथे शुक्रवारी घडला आहे. मराठी भाषिक संघटनांकडून याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला आहे. 

बेळगाव-बागलकोट महामार्गावर निलजी गावच्या वेशित कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषेत ग्रामपंचायत निलजीचा स्वागताचा फलक आहे. मात्र समाजकंटकांनी याठिकाणी मराठी भाषेतील फलकाला काळे फासले असून याठिकाणी "नम्म बेळगावी" (आमचे बेळगाव) असा मजकूर कन्नड भाषेत लिहिला आहे. सध्या निवडणुकांचे वातावरण तापले असून महाराष्ट्र एकीकरण समितीला गावाकडून समर्थन दिले जात आहे. मात्र गावचे वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न समाजकंटकाकडून घडू लागला आहे. 

येळ्ळूर येथील "महाराष्ट्र राज्य येळ्ळूर" हे फलक पोलिसांनी बळजबरीने पाडल्यानंतर त्याचे पडसाद इतर गावांमध्ये उमटले होते. अनेक गावांनी आपल्या गावच्या वेशित महाराष्ट्र राज्य फलक उभारले होते. यावेळी निलजी येथेही असा फलक उभारण्यात आला होता. नंतर पोलिसांकडून तो हटविण्यात आला. बेळगाव-बागलकोट रोडवर निलजी क्रॉसवरून सुमारे अर्धाकिलोमीटर आत गेल्यानंतर निलजी गाव आहे. गावात पूर्णपणे मराठीचाच वापर केला जातो. मात्र गावात जाऊन हुल्लडबाजी करणे समाजकंटकाना शक्‍य नसल्याने निलजी क्रॉसवर लावण्यात आलेल्या फलकाला काळे फासण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum News Marathi Board targeted by Kannad Organisation