स्पाईसजेटची विमानसेवा बेळगावातून कायमस्वरूपी सुरु ठेवण्याची गरज

नागेंद्र गवंडी
मंगळवार, 10 एप्रिल 2018

बेळगाव -  सांबरा विमानतळावरुन सुरु असलेली स्पाईसजेट विमानसेवा हुबळीला स्थलांतरीत झाल्यास बेळगावच्या प्रगतीला खीळ बसणार आहे. शहरातील उद्योग व व्यवसायांवर त्याचा परिणाम शक्‍य आहे. पण, विमानतळावर कार्यरत असलेल्या कामगारांवरही बेरोजगारीचे संकट कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे, स्पाईसजेटची विमानसेवा बेळगावातून कायमस्वरूपी सुरु ठेवण्याची गरज आहे. 

बेळगाव -  सांबरा विमानतळावरुन सुरु असलेली स्पाईसजेट विमानसेवा हुबळीला स्थलांतरीत झाल्यास बेळगावच्या प्रगतीला खीळ बसणार आहे. शहरातील उद्योग व व्यवसायांवर त्याचा परिणाम शक्‍य आहे. पण, विमानतळावर कार्यरत असलेल्या कामगारांवरही बेरोजगारीचे संकट कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे, स्पाईसजेटची विमानसेवा बेळगावातून कायमस्वरूपी सुरु ठेवण्याची गरज आहे. 

बेळगावमधील व्यावसायिक आणि उद्योजकांसह राजकारण्यांना अधिक सोयीस्कर म्हणून स्पाईसजेटला बंगळूर-बेळगाव-मुंबई अशी विमानसेवा सुरु झाली. या सेवेचा फायदाही अनेक व्यापाऱ्यांनी साडेपाच वर्षापासून करून घेतला आहे. अलीकडच्या काळात तर विमान प्रवाशांच्या संख्येतही मोठी वाढ झाली होती. परिणामी स्पाईसजेटला फायदाही मिळत होता. पण, बेळगावमधून सुरु असलेली विमानसेवा स्पाईसजेटने अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा बेळगावच्या विकासावर होणार आहे.

विमानसेवा बंद झाल्यास सर्वात मोठा परिणाम स्थानिक कामगारांवर होणार आहे. सध्या विमानतळावर छोटीमोठी कामे करण्यासाठी स्थानिक लोकांना कामाची संधी दिली आहे. पण, सेवा बंद झाल्यास त्यांना नोकरीला मुकावे लागणार आहे. सध्या विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची ने-आण करणाऱ्या टॅक्‍सीचालकांनाही मोठा फटका बसणार आहे.

विमानसेवा सुरु झाल्यामुळे बेळगावातील हॉटेल व्यवसायाला चांगले दिवस आले होते. नामांकित कंपन्याचे अधिकारी, मालक किंवा अन्य राष्ट्रीय पातळीवरील नेते, राजकारणी बेळगावात येऊन हॉटेलवर थांबायचे. पण, आता विमानसेवा बंद झाल्यास हॉटेल व्यवसायावरही परिणाम जाणवणार आहे. 

विमानसेवा बंद झाल्यास..... 

  • विमानतळावरील मनुष्यबळ अतिरिक्त ठरणार 
  • स्थानिक कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड 
  • शहरातील तारांकित हॉटेल व्यवसायांवर परिणाम 
  • उद्योजक, व्यावसायिक, राजकारण्यांची गैरसोय 
  • तिकीट बुकिंगच्या व्यवसायावरही परिणाम 
  • परराज्यांतून येणाऱ्या कंपन्यावर परिणाम. 

स्पाईसजेटची सेवा 2012 पासून..... 
स्पाईसजेटने नोव्हेंबर 2012 पासून बेळगावमधून विमानसेवा सुरू केली. जवळपास सहा वर्षे कंपनीने सेवा दिली आहे. गेल्या सहा वर्षात अनेकजणांना काम मिळाले आहे. त्याचबरोबर बेळगावसह कर्नाटक आणि इतर राज्याताली उद्योजक, व्यापारी, अधिकारी, मंत्री आणि राजकरण्याना एक उत्तम सेवा होती. पण, आता येथील सेवा हुबळीला स्थलांतरीत केल्यास मोठी अडचण होणार आहे. 

कित्येक वर्षांच्या मागणीनंतर बेळगावातून विमानसेवा सुरू झाली होती. ही सेवा उद्योजकांसाठी सोयीस्कर ठरली होती. पण, आता ही सेवा हुबळीत स्थलांतरीत होणार असल्याने बेळगावच्या उलाढालीवर परिणाम शक्‍य आहे. उद्योजकांना अधिक अडचणीचे आहे. तेव्हा बेळगाव येथून सेवा सुरू ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे. 
- रोहन जुवळी,
उपाध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स 

Web Title: Belgaum News Spicejet airplane service issue