ट्रक चोरी प्रकरणी तिघांना अटक

ट्रक चोरी प्रकरणी तिघांना अटक

निपाणी - येथील मुरगूड रोडवरील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाजवळून ट्रक लांबविल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बुधवारी (ता. 30) तीन संशयित आरोपींना अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक, पिक-अप अशी दोन वाहने व ट्रकमधील मैदा, रवा व पीठाची सुमारे 370 पोती असा मिळून जवळपास 15 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

वैभव नामदेव कोरवी (वय 22, रा. मौजे सांगाव), अवधूत शंकर कालेकर (वय 24) व फिरोज शमशुद्दीन नदाफ (वय 19, दोघेही रा. कसबा सांगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी (ता. 20) गोकुळ शिरगांव (जि. कोल्हापूर) येथील केदारलिंग मिलमधून बाबु फ्रान्सीस फर्नांडीस (वय 24, रा. गुळाप्पूर, जि. कारवार) हा चालक ट्रकमधून (केए 30 8144) मैदा, रवा व गहू पीठाची पोती घेऊन कुमठ्याच्या दिशेने निघाला होता. दरम्यान मिलमधील कामगार वैभवने कर्ज फेडण्यासाठी अवधूत व फिरोज यांच्या सहकार्याने ट्रक लांबविण्याचे ठरविले. त्यानुसार वैभवने तीन साथीदारांसह ट्रकचा पाठलाग पिक-अपमधून (एमएच 09 ईएम 1189) केला. येथील उड्डाणपुलानजिक आल्यावर वैभवने ट्रक गाठून चालक फर्नांडीस याला पिक-अपला धडकून आल्याचे कारण पुढे करून अरेरावी केली. शिवाय ट्रकमधून खाली उतरवून पिक-अपमधून त्याला खडकेवाड्याजवळ पेट्रोल पंपावर नेले.

यावेळी वैभवच्या साथीदारांनी ट्रक पेट्रोल पंपावर आणला. ट्रक तेथेच थांबवून सर्वजण पिक-अपमधून कसबा सांगावच्या दिशेने निघाले. कोगनोळी नाक्‍यावरुन पुढे गेल्यावर ट्रक व त्यातील माल कोठे ठेवयाचा याचा निर्णय करून पुन्हा ते पेट्रोल पंपानजिक आले. यावेळी चालक फर्नांडीसला ट्रक आपल्यामागे आणण्यास सांगून मौजे सांगावला पोचले. तेथून चालक फर्नांडीसला पुन्हा पिकअपमधून सांगली, सांगोला भागात फिरवून आणवून सोमवारी (ता. 21) अक्कोळ येथील कन्या शाळेनजिक त्याला सोडले.

तेथून येऊन फर्नांडीसने 23 मे ला तक्रार दिल्यावर उड्डाणपूल व कोगनोळी नाक्‍यावरील सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे तपास सुरु झाला होता. आज (ता. 30) पहाटे ट्रकमधील काही पोती पिकअपमधून विक्रीसाठी नेताना आडी क्रॉसजवळ मंडल पोलिस निरीक्षक एम. पी. सरवगोळ, पोलिस उपनिरीक्षक अशोक चव्हाण यांनी संशयितांना अटक करण्यासह जप्तीची कारवाई केली. याप्रकरणी विवेक पाटील हा संशयित फरारी आहे. कारवाईत श्री. निलाखे, डी. बी. कोतवाल, आर. एस. कोळी, के. व्ही. दड्डी, एम. एम. जंबगी, शेखर असोदे, यु. एम. कांबळे, संदीप गाडीवड्डर यांनी सहभाग घेतला.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com