सौंदलगा, नवलिहाळच्या मेंढपाळांचा वीज कोसळून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

सौंदलगा - वीज कोसळून सौंदलगा व नवलिहाळ येथील दोन मेंढपाळांचा मृत्यू झाल्याची घटना हावेरी जिल्ह्यातील वडगेरी-मुडूर आणि दावणेगेरे जिल्ह्यातील बीजगट्टी येथे मंगळवारी (ता. 29) सायंकाळी घडली. म्हाळू आण्णाप्पा पुजारी (वय 20, रा. सौंदलगा) आणि संजय आण्णाप्पा पुजारी (वय 17, रा. नवलिहाळ) अशी त्यांची नावे आहेत. या घटनांमुळे दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे. 

निपाणी भागातील धनगर समाजबांधव मोठ्या प्रमाणावर आपल्या शेळ्यामेंढ्यांसह उदरनिर्वाहासाठी दावणेगेरे व हावेरी जिल्ह्यात येथे दरवर्षी जातात. त्याप्रमाणे सौंदलगा व नवलिहाळ येथील पुजारी कुटुंबीय गेले होते. मंगळवारी सायंकाळी मेंढ्या चरवत असताना दोन्ही ठिकाणी  वादळी वाऱ्यासह वीजेचा कडकडाट होऊन जोरदार पाऊस झाला. त्यामध्ये म्हाळू व संजय यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यामुळे दोघेजण जागीच ठार झाले.

दोघांचेही मृतदेह काळवंडून गेले होते. काही क्षणातच परिसरातील मेंढपाळांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांवर उपचारासाठी प्रयत्न केले. पण त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे वैद्याधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे दोन्ही पुजारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

सौंदलगा येथे म्हाळू पुजारी याचा मृतदेह बुधवारी (ता. 30) सकाळी आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, सहा बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. 31) आहे. 

Web Title: Belgaum News two Shepherd's Dead in Lightening