संतीबस्तवाडात जाळला प्रार्थनास्थळातील धर्मग्रंथ; CID कडून सलग दुसऱ्यादिवशी कसून चौकशी, नेमकं काय घडलंय?
Belagav Religious Text Burning : संतीबस्तवाड गावात गेल्या महिन्यात धार्मिक ग्रंथ जाळल्याची घटना घडली आहे. याविरोधात बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी तपासाच्या पातळीवर फारशी प्रगती झाली नव्हती.
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावात नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रार्थनास्थळी असलेले धार्मिक ग्रंथ जाळण्याच्या प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर विभागाकडून (CID) सलग दुसऱ्या दिवशीही (सोमवारी) कसून चौकशी आणि तपासणी झाली.