ऑनलाईन लग्न, ऑफलाईन भोजन! अनोख्या लग्नाची चर्चा तर होणारच

पश्चिम बंगालमध्ये 24 जानेवारीला होणाऱ्या एक लग्न (Wedding Ceremony) चर्चेत आहे. या लग्नासाठी Google Meet वर 350 पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. या सर्व पाहुण्यांसाठी खास पद्धतीने भोजन व्यवस्था केली आहे.
wedding ceremony in West Bengal
wedding ceremony in West BengalSakal

कोरोनानं जगातील अनेक गोष्टी बदलल्या आहेत. लोकांची कामाची पद्धत, खाण्यापिण्याच्या सवयी तसेच इतर गोष्टींत आमुलाग्र बदल झाले. यादरम्यान लग्नसोहळ्यांमध्येही बदल झाल्याचे दिसतं. अलीकडे अनेक लोक व्हर्चुअल वेडींग पर्यायाचा अवलंब करताना दिसत आहे. या लग्नांची चर्चाही होताना दिसते.

असंच एक लग्न होणार आहे पश्चिम बंगालमध्ये (West Bengal). 24 जानेवारीला होणारं हे लग्न अनेक अर्थांनी खास आहे. कारण हे व्हर्च्युअल वेडिंग’ असणार आहे. पश्चिम बंगालच्या बर्दवान (Bardvan) जिल्ह्यात ही लग्नगाठ बांधली जाणार आहे. या लग्नासाठी त्यांनी Google Meet वर 350 पाहुण्यांना आमंत्रित केले आहे आणि या लग्नासाठी उपस्थित पाहुण्यांसाठी खास पद्धतीने भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.

wedding ceremony in West Bengal
Viral Video: ट्रेनची वासराला धडक; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

कोरोना (Corona) निर्बंधांमुळे संदीपन सरकार (Sandipan Sarkar) आणि अदिती दास (Aditi Das) यांच्या लग्न सोहळ्याला केवळ शंभर पाहुणेच प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत, तर उर्वरित ३५० पाहुणे गुगल मीटच्या माध्यमातून लग्नसमारंभाला उपस्थित राहतील. हे सर्व आमंत्रित पाहुणे त्यांच्या घरीच लग्नाचे थेट प्रक्षेपण पाहू शकतील. गुगल मीटवर (Google Meet) एकावेळी 250 लोक सामील होण्याची मर्यादा असल्याने, अतिथींसोबत दोन लिंक शेअर केल्या जातील. शिवाय, प्रत्येक पाहुण्याला भोजन आस्वाद घेता यावा यासाठी एक खास व्यवस्था करण्यात आली आहे. ऑनलाईन लग्न अटेंड करणाऱ्या सर्व पाहुण्यांना झोमॅटोच्या (Zomato) माध्यमातून भोजन पोहोचवले जाईल.

wedding ceremony in West Bengal
Viral Video | माणूस बनला देवदूत, माकडाचे वाचवले प्राण

झोमॅटोलाही कल्पना आवडली असून या लग्नाच्या डिलिव्हरीवर लक्ष ठेवण्यासाठी एक टीम तयार केली आहे. याशिवाय झोमॅटो अधिकृतपणे या कार्यक्रमाची जाहिरात करण्याची योजना आखत असल्याचंही कळतंय.

या अनोख्या लग्नाविषयी बोलताना संदिपन म्हणाला की, “गेल्या वर्षभरापासून आम्ही लग्न करण्याचा विचार करत होतो, परंतु कोरोना एक समस्या बनला. मला माझ्या कुटुंबाच्या आणि पाहुण्यांच्या सुरक्षेची काळजी वाटत होती. 2 जानेवारी ते 4 जानेवारी या कालावधीत कोविड-19 मध्ये मला स्वतःला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मी हा निर्णय घेतला,” असं त्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com