
Viral Video | माणूस बनला देवदूत, माकडाचे वाचवले प्राण
Man Saved life of Monkey : माणुसकी (Humanity) आणि भुतदयेची शिकवण अनेक साधुसंतांनी दिली आहे. मुक्या प्राण्यांना (Animals) मारु नये असं आपण अगदी लहानपणापासून शिकत आलो आहे. आपण स्वतःच्या घरी असलेल्या कुत्रा (Dog), मांजर (Cat) अशा पाळीव प्राण्यांवर(Pet Animal) प्रेम (Love) करतो. मात्र तेच प्राणी इतरत्र दिसले तर त्यांना दगड, काठ्या मारतो. इतर प्राण्यांच्याबाबतही लोकांचं वर्तन असंच असते. परंतु जगात असे अनेक लोक आहेत, जे जगातील प्रत्येक लहानमोठ्या प्राण्याचं अस्तित्व मान्य करतात आणि त्यांना शक्य तितकी मदतही करतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ (Viral Video) पाहिला की अजूनही माणसात भुतदया शिल्लक असल्याची प्रचिती येते.
हेही वाचा: Viral Video|...आणि मांजरीने कोंबडीच्या श्रीमुखात लगावली
या व्हिडीओमध्ये एक निपचित पडलेलं माकड (Monkey) दिसतंय. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे माकड जखमी झालंय. ते कोणतीच हालचाल (Movement) करत नाही. तिथं एक व्यक्ती येते. त्या माकड अत्यावस्थ असलेलं पाहून तो व्यक्ती त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागतो. आधी माकडाला पाठीवर झोपवून त्याला छातीवर (chest) विशिष्ट प्रकारे दाबू लागतो. रुग्ण अत्यावस्थ असल्यावर त्याचं बंद पडत चाललेलं हृदय सुरळीत करण्यासाठी डॉक्टर ज्याप्रकारे छाती दाबतात अगदी तशाच प्रकारे हा व्यक्ती माकडाच्या छातीला प्रेस करत असतो. थोडावेळ सतत दाबल्यानंतर तो व्यक्ती जे करतो ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
हेही वाचा: Viral Video: बाळाला स्तनपान करताना दुधाचा रंग झाला गुलाबी
माकडाला वाचवण्यासाठी तो व्यक्ती त्याला उचलून मांडीवर घेतो आणि कसलीही तमा न बाळगता चक्क आपल्या तोंडाने माकडाला हवा देऊ लागते. नंतर पुन्हा त्याच्या छातीवर प्रेस करू लागतो. शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश येतं आणि माकड हालचाल करू लागते. माकडाची हालचाल झाल्याचं पाहून तो व्यक्तीही खूप खुश झाल्याचं व्हिडीओच्या शेवटी दिसत आहे.
sarcastic.ind या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या या व्हिडीओमधील माकडाला जीवदान देणाऱ्या त्या व्यक्तीचे नाव श्री. प्रभू आहे. काही वर्षांपूर्वी शिकलेलं प्रथमोपचार तंत्र वापरून त्याने माकडाला जीवदान दिली. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय. लोकांनीही श्री. प्रभू यांच्या कामाचं कौतुक केलंय.
Web Title: One Person Has Saved The Life Of A Monkey Injured In A Dog Attack
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..