esakal | “दीदी ओ दीदी” बोलणारा दादा कुठेय?

बोलून बातमी शोधा

mamata banerjee narendra modi
“दीदी ओ दीदी” बोलणारा दादा कुठेय?
sakal_logo
By
नामदेव कुंभार

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीचं चित्र थोड्याळात स्पष्ट होईल. सध्याच्या निकालानुसार ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार हे स्पष्ट दिसतेय. सध्या ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षानं 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. स्पष्ट बहुमताचा आकडा पार केल्यानंतर टीएमसीमधून भाजपावर टीकास्त्र सोडलं जात आहे. टीएमसी खासदार काकोली दास्तीदार यांनी मोदी सरकारवर निशाना साधला आहे. काकोली यांनी ट्विट करत भाजपला लक्ष केलेय. काकोली यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, दीदी ओ दीदी बोलणारा दादा कुठे गेला? दादागिरी चालणार नाही. हा बांग्ला आहे. बंगाल नाही.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी प्रचारसभा आणि रॅलीमार्फत भाजपचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. प्रचारसभांमध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर टीकाही केली होती. मोदी यांनी प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांना कामावर टीका करताना दीदी ओ दीदी असं अनेकदा म्हटले. मोदींच्या या वक्तव्यांवर टीएमसीनं अनेकदा आक्षेप घेतला होता.

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन यांनीही ट्विट करत भाजपावर निशाना साधलाय. डेरेक यांनी अमित शाह यांचं बंगालमध्ये भाजपा 200 जागा जिंकेल, असं वक्तव्य टाकलेय. अन् त्यापुढे सुरुवातीच्या निकालात टीएमसचं 200 जागांपुढे पोहचलेय, असं म्हटलेय.