ममतादीदींना धक्क्यावर धक्के; आणखी एका कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 22 January 2021

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत

कोलकाता- विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. ममता सरकारमधील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याने राजीनामा दिला आहे. बंगाल सरकारमधील वनमंत्री राजिब बॅनर्जी यांनी कँबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाकडून केव्हाही जाहीर केली जाऊ शकते. निवडणुका जशा-जशा जवळ येत आहेत, तसंतसं तृणमूल काँग्रेसमधील राजीनाम्यांना वेग आला आहे. राज्यमंत्री राजिब बॅनर्जी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनामा पत्रात बॅनर्जी यांनी लिहिलंय की, 'पश्चिम बंगालच्या जनेतेची सेवा करणे त्यांच्यासाठी गर्वाची गोष्ट होती. त्यासाठी त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.' याआधी शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूलचा राजीनामा दिला आहे. लक्ष्मी रतन शुक्ला यांनीही आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.  

जुन्या 100 रुपयांच्या नोटा चलनातून होणार बाद? वाचा आरबीआयने काय म्हटलंय

तृणमूल काँग्रेसचे आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी बुधवारी भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला होता. भट्टाचार्य पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील शांतीपूर मतदारसंघातून आमदार आहेत. तृणमूलमध्ये काम करताना त्यांना स्वातंत्र्य मिळत नसल्याचा आरोप भट्टाचार्य यांनी केला होता. तसेच ममता सरकारकडे तरुणांसाठी कोणताच दृष्टीकोन नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूलमधील राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमूलच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावर बोलताना बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, ज्यांना भाजपमध्ये जायचंय त्यांनी खुशाल जावं, पण आपला पक्ष भाजपसमोर झुकणार नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bengal forest minister Rajib Banerjee resigns as Cabinet minister