जुन्या 100 रुपयांच्या नोटा चलनातून होणार बाद? वाचा आरबीआयने काय म्हटलंय

टीम ई सकाळ
Friday, 22 January 2021

नोटाबंदी केल्यानंतर बाजारात कमी वेळात लोकांना जास्त पैसे मिळावेत यासाठी सुरुवातीला 2 हजार रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात छापण्यात आल्या होत्या.

नवी दिल्ली - सध्या चलनात असलेल्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या सर्व नोट मार्च किंवा एप्रिलपर्यंत बाजारातून काढून घेण्याचा विचार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Reserve Bank of India (RBI) करत आहे. आरबीआयचे असिस्टंट जनरल मॅनेजर बी महेश यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. जिल्हा स्तरावरील बँकांनी आयोजित केलेल्या एका बैठकीत बी महेश बोलत होते.

10 रुपयांचे कॉईन्स बाजारात आणून 15 वर्षांचा कालावधी लोटला आहे. असे असले तरी व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी कॉईन्सना स्वीकारलेले नाही. अजूनही अनेकांच्या मनात 10 रुपयांच्या कॉईन्सबद्दल शंका आहे. त्यामुळे नवीन कॉईन्स रिझर्व्ह बँकेसाठी अडचणीचे ठरले असल्याचे बी महेश म्हणाले. लोकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी बँकेकडून काही प्रयत्न केले जावेत, तसेच लोकांनी 10 रुपयांच्या कॉईन्सचा वापर करावा यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले पाहिजे, असंही ते म्हणाले.

हे वाचा - यंदाचं बजेट 'पेपरलेस'; जाणून घ्या ब्रीफकेस पासून पेपरलेसपर्यंत झालेला 'बजेट'चा प्रवास

2019 मध्ये रिझर्व्ह बँकने 'राणी की वाव' दाखवणाऱ्या नव्या डिझाईनमधील 100 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. असे असले तरी जुन्या नोटा चलनात तशाच सुरु राहणार आहेत. 8 नोव्हेंबर 2016 मध्ये मोदी सरकारकडून नोटाबंदी करण्यात आली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने 200 रुपयांच्या नोटाही चलनात आणल्या आहेत. मात्र, सध्या चलनात असलेल्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या सर्व नोट मार्च किंवा एप्रिलपर्यंत बाजारातून काढून घेण्याचा विचार आरबीयाचा असल्याचं महेश यांनी सांगितलं. 

हे वाचा - मी, ‘सेन्सेक्स’ ५० हजारी!

2000 रुपयांची नोट चलनात दिसत नसल्याच्या प्रश्नावरही बी महेश यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जास्त किंमत असलेल्या नोंटाची छपाई तात्पुरती थांबवली आहे. त्यामुळे सध्या बाजारात 2000 रुपयांच्या नोटा जास्त दिसत नसल्याचं त्यांनी सांगितलं. नोटाबंदी केल्यानंतर बाजारात कमी वेळात लोकांना जास्त पैसे मिळावेत यासाठी सुरुवातीला 2 हजार रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात छापण्यात आल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central bank planning old rs 100 notes withdrawal by march says RBI assistant manager