esakal | बंगालच्या मतदारांनी देशासाठी आवाज उठवावा - चिदंबरम

बोलून बातमी शोधा

Chidambaram
बंगालच्या मतदारांनी देशासाठी आवाज उठवावा - चिदंबरम
sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - ‘देशातील ‘वैद्यकीय आपत्ती’ला भाजपला जबाबदार धरत पश्‍चिम बंगालमधील सध्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करताना तेथील नागरिकांनी संपूर्ण देशाच्या वतीने आवाज उठवावा,’ असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी बुधवारी केले.

देशात जी वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला फक्त भाजप जबाबदार आहे. आता पश्‍चिम बंगालमधील मतदारांच्या हातात देशाचे भवितव्य आहे. संपूर्ण देशासाठी आवाज उठविण्याची मोठी संधी मतदारांना आहे,’ असे ट्विट त्यांनी केले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर चिंता व्यक्त करीत एप्रिल २०२१पासून आतापर्यंत काय बदल झाला आहे. जर असेल तर तो म्हणजे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

हेही वाचा: कोव्हॅक्सिन लस कोरोनावर 78 टक्के प्रभावी; भारत बायोटेकचा दावा

बंगालमध्ये लॉकडाउन नाही - ममता

माल्दा - पश्चिम बंगालमध्ये लॉकडाउनची शक्यता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फेटाळून लावली. प्रत्येकाने निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी पाच मेपासून लसीकरण सुरु होईल, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने लस आणि ऑक्सिजन मोफत पुरवावी, अशी मागणी त्यांनी केली.