अभिनेत्री झाली खासदार; 'ती' छायाचित्रे झाली व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bengali actress Nusrat Jahan

बंगाली चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱया एकोणतीस वर्षीय नुसरतनेही निवडणूक लढवली आणि विजयी झाली. नुसरत विजयी झाल्यानंतर सोशल मीडियावर तिचे मॉडेलिंग क्षेत्रातील छायाचित्रे व्हायरल होऊ लागली आहेत.

अभिनेत्री झाली खासदार; 'ती' छायाचित्रे झाली व्हायरल

कोलकताः पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवणारी अभिनेत्री नुसरत जहाँ (वय 29) विजयी झाली. नुसरत जहाँ विजयी झाल्यानंतर तिचे मॉडेलिंगमधील फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. या निवडणूकीत नुसरतने तब्बल तीन लाख 50 हजार 369 मतांनी विजय मिळवला आहे.

कला, क्रीडा क्षेत्रात कामगिरी करणाऱया अनेकांनी लोकसभा निवडणूक लढविली. यामध्ये काहींना यश तर काहींना अपयश आले आहे. बंगाली चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱया एकोणतीस वर्षीय नुसरतनेही निवडणूक लढवली आणि विजयी झाली. नुसरत विजयी झाल्यानंतर सोशल मीडियावर तिचे मॉडेलिंग क्षेत्रातील छायाचित्रे व्हायरल होऊ लागली आहेत.

नुसरतचा जन्म पश्चिम बंगालमधील कोलकतामध्ये 8 जानेवारी 1990 मध्ये झाला. बंगाली चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून नुसरतची ओळख आहे. कोलकातातील 'अवर लेडी क्वीन ऑफ द मिशन स्कूल'मधून तिने सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. भवानीपूर कॉलेजमधून तिने बी. कॉमची पदवी घेतली आहे. नुसरत सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर सतत अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत फोटो व व्हिडिओ शेअर करत होती. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. 2011 मध्ये तिने बंगाली चित्रपट 'शोत्रू'मधून अभिनयाला सुरुवात केली. तिच्या अभिनयाची अनेकांनी प्रंशसा केली. पुढे तिने अनेक दिग्गज कलाकारांसोबत भूमिका निभावल्या. कोलकातामध्ये राहणाऱ्या व मॉडेल असलेल्या नुसरतने 'बोलो दुर्गा माई की', 'हर हर ब्‍योमकेश', 'जमाई 420' यांसारख्या चित्रपटांतून भूमिका साकार केल्या आहेत.

Web Title: Bengali Actress Nusrat Jahan Wins Loksabha After Photo Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top