esakal | अन् या अभिनेत्रीला विचारले जाऊ लागले, तुमचा रेट काय?
sakal

बोलून बातमी शोधा

girl.jpg

आजच्या सोशल मिडियाच्या जमाण्यात कोणालाही बदनाम केले जात आहे. एका बंगाली अभिनेत्रीली देखील अशाच विनाकारण बदनामीला सामोरे जावे लागले आहे.

अन् या अभिनेत्रीला विचारले जाऊ लागले, तुमचा रेट काय?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : आजच्या सोशल मिडियाच्या जमाण्यात कोणालाही बदनाम केले जात आहे. एका बंगाली अभिनेत्रीली देखील अशाच विनाकारण बदनामीला सामोरे जावे लागले आहे.

बंगाली टीव्ही अभिनेत्री बृष्टी रॉयचे गेल्या काही दिवसांपासून जगणे कठीण झाले आहे. बृष्टीला सतत कुणाचे ना कुणाचे तरी फोन येत आहेत आणि तु एस्कॉर्ट सर्व्हिस देते का? तुझे रेट काय आहेत? असे अनेक प्रश्न तिला विचारले जात आहेत. मात्र हे फोन का येत आहेत हे बृष्टीला जेव्हा कळाले तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच सरकली. बृष्टीचा एस्कॉर्ट सर्व्हिस पोस्टवर फोटो छापण्यात आला होता. 

दरम्यान, बृष्टीचे हे पोस्टर कोलकाताच्या लोकल ट्रेन आणि रेल्वे स्थानकांवर लावण्यात आले होते. या पोस्टरवर बृष्टीचा फोटो, नाव आणि फोन नंबर दिला होता. या संबधात बृष्टीने आयएएनएसशी संवाद साधला. ‘मला २४ ऑगस्ट पासून अनोळखी नंबरवरुन फोन येत आहेत. सुरुवातीला मला हे स्पॅम कॉल असल्याचे वाटले. मात्र तीन दिवसानंतर मला माझ्या मित्राने लोकल ट्रेनमधील पोस्टरबाबत सांगितले. हे पोस्टर एस्कॉर्ट सर्व्हिसचे होते. या पोस्टरवर माझे नाव, फोटो आणि फोन नंबर देण्यात आला होता. त्याने मला या पोस्टरचा फोटो पाठवला. ते ऐकून मला धक्काच बसला. मला त्यानंतरही सतत फोन येत होते आणि मला सर्व्हिसचे रेट विचारले जात होते. त्यांना माझा नंबर त्या पोस्टद्वारे मिळाला हे देखील त्यांनी सांगितले’ असे बृष्टी म्हणाली. 

छोट्या पडद्यावर काम करणारी बृष्टी सोनारपुरमधील मालंचा येथे राहते. ती बंगाली मालिकांमध्ये काम करते. या सर्व फोन कॉलला कंटाळून बृ्टीने नंबर बदलण्याचा निर्णय घेतला होता. ‘मी कंटाळून नंबर बदलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता ते ही करता येणार नाही. कारण पोलिसांची या बाबत चौकशी सुरु आहे. त्यांना या प्रकरणाचा तपास घेण्यासाठी माझा नंबर हवा आहे. माझे संपूर्ण काम याच नंबरने सुरु असल्याने मी एका रात्रीमधून नंबर बदलू शकत नाही. माझा विश्वास आहे पोलिस दोषीला लवकरात लवकर पकडतील’ असे पुढे बृष्टी म्हणाली आहे. 

दरम्यान, बृष्टीने सोनारपुर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिस या घटनेची दखल घेत आहेत. याबाबत चौकशी सुरू आहे. पण अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही’ असे पोलिस अधिक्षक राशिद खान यांनी सांगितले

loading image