Bengaluru: ‘ओ कंडक्टर एक रूपया द्या, नाहीतर कोर्टात या’; बंगळुरूच्या तरूणाला मिळाले तीन हजार रूपये!

तीन हजार रूपये मिळाल्यावर तो म्हणतो, गोष्ट केवळ एक रूपयांची नव्हती.. वाचा अधिक
Bengaluru
Bengaluruesakal

बसमध्ये कंडक्टरने सुट्टे पैसे मागितल्यावर तूमच्याकडे नसतील. तर, तूम्ही एखादी नोट त्याच्याकडे सरकवता. आणि सुट्टे पैसे मागता. त्यावर कंडक्टरही कुरबूर करत पैसे घेतो आणि सुट्टे देतो. एखाद्यावेळेस नसतील पैसे सुट्टे तर तूम्ही स्टॉप आला म्हणून उतरून निघून जाता. पण, एका व्यक्तीने कंडक्टरने एक रूपया परत दिला नाही म्हणून त्याला कोर्टात खेचले.

हि घटना आहे २०१९ मधील. एका व्यक्तीने बंगळुरू महानगर परिवहन महामंडळाला ग्राहक न्यायालयात खेचले. त्यावर त्या व्यक्तीला चार वर्षांनी न्याय मिळाला असून मंडळाकडून त्याला तीन हजारची नुकसान भरपाई देण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे.

Bengaluru
Viral Video: जेव्हा खासगी कंपनीत होते खऱ्या खुऱ्या सिंहाची एन्ट्री! व्हिडिओ पाहाल तर बसेल धडकी

2019 मध्ये रमेश नाईक नावाचा एक व्यक्ती बीएमटीसीच्या बसमधून शांतीनगर ते मॅजेस्टिक बस डेपोला गेला होता. यादरम्यान कंडक्टरने २९ रुपयांचे तिकीट काढले. तक्रारदाराने ३० रुपयेही दिले, मात्र त्यांना एकही रुपया परत दिला नाही. याबाबत नाईक यांनी बीएमटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कंडक्टरची तक्रार केली.

Bengaluru
Viral Video : 'अहो वहिनी जरा जपून'; रील बनवताना आंटी थेट नाल्यात

मात्र त्यांनी नाईक यांना मदत करण्याऐवजी त्यांची चेष्टा करून त्यांना पळवून लावले. यामुळे दुखावलेल्या नाईक यांनी स्थानिक ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली आणि 15 हजार रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली.

Bengaluru
Viral : प्रेमात सैराट होऊन पाकिस्तानातून पळून आली 16 वर्षांची मुलगी पण इंजिनियर मुलगा निघाला...

या प्रकाराबाबत रमेशने मिडीयाला सांगितले की, त्या बस प्रवासाचा मनस्ताप झाला. गोष्ट केवळ एक रूपया परत करण्याची नव्हती. तर मी तो रूपया परत मागितल्यावर माझ्याची झालेल्या गैरवर्तणूकीची होती. त्याच गोष्टीमूळे मी न्यायालयात गेलो.

आता न्यायालयाने बीएमटीसीला पीडितेला 3000 रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहक न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी निकालात म्हटले आहे की, तक्रार क्षुल्लक स्वरूपाची आहे. परंतु बीएमटीसी बस कंडक्टरची वर्तणूक आणि बेजबाबदार होती.

Bengaluru
Viral Video : लेकीकडून वडिलांच्या वाढदिवसासाठी अनोखं गिफ्ट; अश्रू अनावर

एक रुपये असले तरीही त्याचे पैसे वसूल करणे हा ग्राहकाचा अधिकार आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींनुसार तो बीएमटीसीकडून योग्य नुकसानभरपाई मिळविण्याचा हक्कदार आहे. नाईक यांना सर्व पैसे त्यांना ४५ दिवसांत परत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com