Viral : प्रेमात सैराट होऊन पाकिस्तानातून पळून आली 16 वर्षांची मुलगी पण इंजिनियर मुलगा निघाला...

या १६ वर्षीय मुलीने व्हिजाशिवाय भारतात एंट्री करण्यासाठी नेपाळ आणि दुबईत सुद्धा प्रवास केला.
Viral
Viral Sakal

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. अनेकदा आपल्या आवडत्या जोडीदाराला भेटण्यासाठी किंवा त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टींचा त्याग करत असतो. पण सध्या पाकिस्तानातील एक मुलगी भारतातील एका तरूणाला भेटण्यासाठी व्हिजाशिवाय नेपाळ आणि दुबई येथे गेली आहे. सोशल मीडियातून जुळलेले प्रेमाची ही कहाणी...

Viral
अशीही कृतज्ञता! फ्लेमिंगोवर फक्त एकदाच उपचार केला होता, पण...; काळजाला हात घालणारा Video

अधिक माहितीनुसार, पाकिस्तानी तरूणीची आणि भारतातील उत्तरप्रदेशातील एका तरूणाची सोशल मीडियावरून ओळख झाली आणि त्यांची मैत्री झाली. काही काळानंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण व्हिजा मिळणे कठीण होता. त्यामुळे मुलीने शक्कल लढवली.

मुलगी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी भारतात येण्यासाठी प्रयत्न करू लागली. व्हिजाशिवाय भारतात येण्यासाठी तिने दुबई आणि नेपाळमध्ये प्रवास केला पण तिला भारतात येणे शक्य झालं नाही. त्यानंतर तिला समजलं की, भारतातला तरूण जो तिला मुस्लीम आणि इंजिनिअर असल्यांच सांगत होता तो खराखुरा सुरक्षारक्षक होता. त्यानंतर या प्रेमाचे सगळे भिंग फुटले आणि हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com