बंगळूर : बंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ (Chinnaswamy Stadium Tragedy) झालेल्या चेंगराचेंगरी आणि त्यातून अकरा जणांच्या मृत्यूच्या घटनेसाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah), उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर जबाबदार असल्याचा आरोप भाजप-धजदने केला आणि तिघांच्या राजीनाम्याची मागणी केली.