बंगळूर (कर्नाटक) : तुमकुरु जिल्ह्यातील कोराटगेरे तालुक्यात (Bengaluru Crime Case) कोलाला गावाजवळ काही दिवसांपूर्वी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये एका महिलेचे कापलेले अवयव सापडल्याने खळबळ माजली होती. पोलिस (Police) तपासानंतर या भीषण हत्येचा उलगडा झाला असून, आरोपी स्वतः पीडितेचा जावई निघाला. डॉ. रामचंद्रप्पा नावाच्या दंतचिकित्सकाने आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या करून तिचे 19 तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. या प्रकरणात रामचंद्रप्पासह त्याचा सासरा आणि दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.