बंगळूर : कर्नाटकच्या राजधानीतून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. चिकपेटजवळील सीके अचुकट्टू परिसरात (Achukattu Police) एका महिलेचा मृतदेह कचरा गाडीत आढळला. हा मृतदेह एका मोठ्या पोत्यात भरून टाकण्यात आला होता. विशेष म्हणजे, महिलेचे (Woman) पाय गळ्याभोवती बांधले गेले होते, ज्यामुळे या प्रकरणात हत्येचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला.