Bengaluru Domestic Case
esakal
बंगळूर : राजधानी बंगळूरमध्ये पतीनेच पत्नीची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक (Wife Killed by Husband) घटना समोर आली आहे. पत्नीच्या कामाबाबत निर्माण झालेला संशय आणि सततचे वाद अखेर हत्येत संपले. संपिगेहळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अग्रहार लेआऊट येथे ही घटना घडली असून, ३९ वर्षीय आयेशा सिद्दीकी ह्या महिलेची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात तिचा पती सैय्यद जाबी हा आरोपी असून, हत्या केल्यानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन शरण आला आहे.