Bengaluru Police
esakal
सीसीबी पोलिसांनी सात ड्रग्ज तस्करांना अटक करून ९.९३ कोटींचा साठा जप्त केला.
अटक केलेल्यांमध्ये विदेशी नागरिक, सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि दंतवैद्यकीय विद्यार्थी आहेत.
जप्त मालामध्ये एमडीएमए, एक्स्टसी गोळ्या, हायड्रोकॅन्नबिस आणि गांजाचा समावेश आहे.
बंगळूर : येथे सीसीबी पोलिसांना (Bengaluru Police) सात ड्रग्ज तस्करांना अटक करून त्यांच्याकडून ९.९३ कोटींचे ड्रग्ज जप्त (Drug Bust) करण्यात यश आले आहे. अटक केलेल्यांमध्ये दोन विदेशी, एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि एक डेंटल (दंतवैद्यकीय) विद्यार्थ्याचा समावेश आहे. तसेच तीन किलो ८५८ ग्रॅम एमडीएमए क्रिस्टल, ४१ ग्रॅम एक्स्टसी गोळ्या, एक किलो ८२ ग्रॅम हायड्रोकॅन्नबिस, सहा किलो गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार आणि दुचाकी जप्त केल्याची माहिती शहर पोलिस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.