

Soil Collapse at Bengaluru Flyover Site Kills Two Workers
Esakal
Bengaluru Flyover Accident: कंठीरवा स्टुडिओसमोरील डॉ. राजकुमार यांच्या समाधीस्थळाजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांची नावे सोनाराम (वय २६) आणि परिमल (३१) अशी असून, ते झारखंड व पश्चिम बंगालमधील रहिवासी होते.