esakal | गर्लफ्रेंडसोबत अफेअर तोडण्याचा शब्द, पत्नीने पोटच्या मुलाच्या हत्येत नवऱ्याला केली मदत
sakal

बोलून बातमी शोधा

'गर्लफ्रेंडसोबत अफेअर तोडतो', पत्नीने मुलाच्या हत्येत नवऱ्याला दिली साथ

'गर्लफ्रेंडसोबत अफेअर तोडतो', पत्नीने मुलाच्या हत्येत नवऱ्याला दिली साथ

sakal_logo
By
दीनानाथ परब

बंगळुरु: बंगळुरुमध्ये (Bengaluru) राहणाऱ्या एका व्यक्तीने पोटच्या दहा वर्षाच्या मुलाची हत्या (Murder) केली. त्यानंतर मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि गुन्हा लपवण्यासाठी त्याने गर्लफ्रेंड (Girl friend) आणि पत्नीची मदत घेतली. सुनील कुमार (३०) असे आरोपीचे नाव आहे. सात फेब्रुवारीला गर्लफ्रेंडच्या समोर त्याने मुलाची हत्या केली. त्यानंतर पत्नी आणि गर्लफ्रेंडच्या मदतीने त्याने तामिळनाडूच्या (Tamilnadu) जंगलात मृतदेहाची विल्हेवाट लावली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. तिन्ही आरोपी बंगळुरुचे गुरप्पाणपल्याचे रहिवासी आहेत.

गुन्हा लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सुनील कुमारने २६ ऑगस्टला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. सात फेब्रुवारीला मुलगा मित्राच्या घरी गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता आहे, असे त्याने पोलीस तक्रारीत म्हटले होते. मुलगा सात फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे. मग मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवायला त्याने सहा महिने का घेतले? असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यातूनच पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला.

हेही वाचा: राज ठाकरेंच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मनसेची पहिली प्रतिक्रिया

"मुलगा फेब्रुवारी पासून गायब आहे आणि आता तो तक्रार नोंदवतोय, हे पाहून आम्हालाचा धक्का बसला. आम्हाला लगेच त्याच्यावर संशय आला. काहीतरी काळबेर असल्याचं आम्हाला जाणवलं. कारण कुठलेही पालक मुलगा किंवा मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवायला सहा महिने थांबणार नाहीत" असे तपास अधिकाऱ्याने सांगितले. सुनील कुमार वेगळ्या कंपनीत काम करतो. त्याची २६ वर्षीय पत्नी आणि गर्लफ्रेंड एकाच गारमेंट कारखान्यात नोकरी करतात. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर सुनील कुमारचे विवाहबाह्य संबंध उघड झाले. सुनील कुमारने पोलीस तपासात अनेक विरोधाभास निर्माण करणारी वक्तव्य केली. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरचा संशय अधिकच बळावला.

हेही वाचा: गल्ली क्रिकेट ते वर्ल्ड कप व्हाया IPL; मुंबईच्या तळपत्या 'सूर्या'चा प्रवास

सुनील कुमारनेच मुलाच्या डोक्यात पाईप आणि अन्य वस्तुंनी प्रहार करुन त्याची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. "सुनील कुमारच्या विवाहबाह्य संबंधांवर त्याच्या पत्नीला आक्षेप होता. कुमारचा मुलगाही त्याला या बद्दल काहीतरी बोलला होता. त्याचा राग पित्याच्या मनात होता. संतापाच्या भरात सुनील कुमारने गर्लफ्रेंडसमोरच मुलाची हत्या केली" असे पोलिसांनी सांगितले. घटनेच्या रात्री पत्नी कामावरुन घरी परतली. त्यावेळी आरोपीने आणि त्याच्या गर्लफ्रेंडने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने पत्नीला त्याचे विवाहबाह्य संबंध संपवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तिघे गाडीतून मुलाचा मृतदेह घेऊन गेले व तामिळनाडूच्या बारगुर जंगलात मृतदेहाची विल्हेवाट लावली. पत्नीच्या कुटुंबीयांनी वारंवार मुलाबद्दल विचारायला सुरुवात केल्यानंतर आरोपीने मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

loading image
go to top