esakal | गल्ली क्रिकेट ते वर्ल्ड कप व्हाया IPL; मुंबईच्या तळपत्या 'सूर्या'चा प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

Suryakumar Yadav

गल्ली क्रिकेट ते वर्ल्ड कप व्हाया IPL; मुंबईच्या तळपत्या 'सूर्या'चा प्रवास

sakal_logo
By
सुशांत जाधव

मुंबईच्या गल्ली क्रिकेटमधून उगवलेला 'सूर्य' आयपीएलमध्ये चमकला. मुंबई इंडियन्सकडून धमाकेदार कामगिरी करत त्याने क्रिकेटच्या लाखो चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडलं. आयपीएलच्या मैदानातील त्याचा खेळ पाहून अल्पावधीत त्याचा मोठा फॅन फॉलोवर्स निर्माण झाला. त्याला टीम इंडियात स्थान मिळावे, अशी मागणी सोशल मिडियावरुन करण्यात आली. बीसीसीआयच्या निवड समीतीने यावर सकारात्मक विचार केला आणि त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्यातील क्षमता सिद्ध करुन दाखवली. ओमान आणि युएईच्या मैदानात रंगणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठीही त्याला संघात स्थान मिळाले. ही कहाणी आहे भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादवची. त्याच्या 31 व्या बर्थडे दिवशी जाणून घेऊयात त्याचा गल्ली क्रिकेट ते टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडीदरम्यानचा खास प्रवास....

14 सप्टेंबर 1990 मध्ये मुंबईमध्ये जन्मलेला सूर्यकुमार मुळचा उत्तर प्रदेशचा. त्याचे वडील भाभा परमाणु रिसर्स सेंटरमध्ये अभियांता होते. त्यांच्या नोकरीमुळेच सुर्याचे कुटुंबिय वाराणसीहून मुंबईला आले आणि इथेच स्थायिक झाले. मुंबईच्या गल्ली क्रिकेटमध्ये खेळताना सूर्यानं टीम इंडियासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले. त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली. आणि आता तो टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी सज्ज झालाय.

हेही वाचा: "मी उदास होतो, धनश्रीने मला समजावलं की..."; चहलची कबुली

हेही वाचा: काहीही हं नेटकऱ्यांनो; धनश्रीसोबत नाचले म्हणून बाहेर बसले!

सूर्यकुमार यादवने क्रिकेटर होण्याचे स्वप्न बाळगले. त्याला कुटुंबियांचीही साथ मिळाली. शाळेपासूनच त्याने याची तयारी सुरु केली. वेंगसकर अकादमीत प्रवेश घेऊन त्याने क्रिकेटचे धडे घेतले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने तो मेहनत घेत होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तब्बल 10 वर्षांची मेहनत आणि त्यानंतर आयपीएलमधील धमाका यामुळे त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले गेले.

खास रेकॉर्ड

देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठीत रणजी ट्रॉफीतील पहिला सामना तो 2010 मध्ये खेळला. दिल्ली विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने 73 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात फिफ्टी करणारा मुंबईचा तो एकमेव फलंदाज आहे. 2011-12 च्या रणजी हंगामात सूर्यकुमार यादवने 9 सामन्यात 68.54 च्या सरासरीने 754 धावा कुटल्या होत्या. प्रथम श्रेणीतल 77 सामन्यात 10 शतक आणि 20 अर्धशतकही त्याच्या नावे आहेत.

loading image
go to top