

Summary
मुलगी आणि तिच्या प्रियकराने २४ ऑक्टोबर रोजी आईचा खून करण्याचा कट मॉलमध्ये रचला.
२५ ऑक्टोबर रोजी आरोपींनी नेत्रावतीचा टॉवेलने गळा दाबून खून केला आणि आत्महत्येसारखे भासवले.
पोलिसांनी चौघा अल्पवयीन मुलांना अटक केली असून, १३ वर्षीय मुलाची चौकशी सुरू आहे.
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील उत्तरहल्ली भागातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका ३४ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचे मानले जाते होते,परंतु पोलिस तपासात एक भयानक सत्य उघड झाले, तिचा खून तिच्याच १७ वर्षीय मुलीने प्रियकर आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने केला असल्याचे समोर आले आहे.