मुस्लिम व्यक्तीने हनुमान मंदिरासाठी दान केली जमीन

muslim man donates land for hanuman temple
muslim man donates land for hanuman temple

भारत हा एक असा देश आहे जिथे अनेक जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात. भारतात गंगा-जमुनी तहजिब अनेक वर्षांपासून चालत आली आहे. अनेकदा धर्मांमध्ये तेढ निर्माण केली जाऊन फूट पाडण्याचे राजकारणही केलं जात असलं तरीही धार्मिक एकात्मतेची अनेक उदाहरणे आजही पहायला मिळतात. असेच एक उदाहरण अलिकडेच समोर आले आहे. बंगलुरुमधल्या एका मुस्लिम व्यक्तीने एका हनुमान मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी जवळपास 80 लाख ते 1 कोटी रुपयांच्या किंमतीची जमीन दान केली आहे. या व्यक्ती हनुमानाच्या मंदिरासाठी 1.5 गुंठे जमीन दान केली आहे. 


लोक करताहेत कौतुक
याबाबतचे वृत्त डेक्कन हेराल्ड दिले आहे. या बातमीनुसार, या मुस्लिम व्यक्तीचा कार्गोचा व्यवसाय आहे. त्यांचं नाव एचएमजी बशा आहे. त्यांचं वय 65 वर्षे आहे. त्यांनी मंदिरांच्या निर्मितीसाठी जमीन दान करुन अनेक लोकांचं हृदय जिंकलं आहे. बंगलुरुच्या काडूगोडीमधील बेलाथूरचे ते रहिवासी आहेत. त्यांच्याजवळ 3 एकरहून अधिक जमीन आहे. 

हेही वाचा - POK मधून चूकून भारतात आल्या; सख्ख्या बहिणींची भेटवस्तूंसह सैन्याने केली पाठवणी​
मंदिरासाठी जागा कमी पडली म्हणून जमीन केली दान
हे मंदिर तीन दशकांहून जुने असल्याचं बोललं जातंय. या मंदिराच्या जिर्णोद्धारावेळी जमीन कमी पडत असल्याचे लक्षात येताच त्यांनी हा निर्णय घेतला. कमी जमिनीमुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं असतं. त्यांनी म्हटलं की, गावकऱ्यांनी मंदिराच्या जिर्णोद्धाराची योजना आखली होती. परंतु, त्यासाठी आवश्यक तेवढी जमीन नव्हती. याबद्दल जेंव्हा मला माहित पडलं तेंव्हा मी तीन एकरमधील 1.5 गुंठा जमीन दान करायचा निर्णय घेतला. 

द्वेष पसरवून काय मिळणार?
या जमीनीची लोकेशन खूप चांगली आहे. या जमिनीच्या जवळूनच ओल्ड मद्रास रोड आहे. बशा यांचा परिवार देखील त्यांच्या या निर्णयाशी सहमत आहे. बशा यांनी म्हटलं की, आज आम्ही आहोत, कदाचित उद्या असणार नाही. आपले आयुष्य अनिश्चित आहे. अशा परिस्थितीत एकमेकांविषयी द्वेष पसरवून काय मिळणार आहे? या गावातल्या लोकांनी बशा यांच्या या भुमिकेचं आणि कृतीचं कौतुक करत त्यांच्या या चांगुलपणाबाबत एक पोस्टर गावात लावलं आहे. बशासारखे लोकच खऱ्या भारताचे वारसदार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com