Parappan Agrahara Jail
esakal
गुंड गुब्बची सीनने तुरुंगात वाढदिवस साजरा केला.
व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
तुरुंग सुरक्षेतील अपयश आणि कैद्यांना दिल्या जाणाऱ्या विशेष सुविधांवर संताप व्यक्त झाला.
बंगळूर : परप्पन अग्रहार तुरुंगातील (Parappan Agrahara Jail) सुरक्षेचे अपयश पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. सर्जापूर पोलिस ठाण्यातील कुख्यात गुंड गुब्बची सीन (Gubbi Scene) याने तुरुंगात केक कापून आणि सफरचंदाचा हार घालून आपला वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे तुरुंग अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर आणि कैद्यांना दिल्या जाणाऱ्या शाही आदरातिथ्यावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.