esakal | Bengaluru riots : धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवरुन वादंग, तिघांचा मृत्यू तर 145 जण अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

Bengaluru riots

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस आमदार मूर्ती यांचा भाचा पी नवीन यांनी अल्लाहचे थोर प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती.

Bengaluru riots : धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवरुन वादंग, तिघांचा मृत्यू तर 145 जण अटकेत

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

बंगळुरु: कर्नाटकमधील काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ति यांचा भाचा पी नवीन यांच्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टनंतर बंगळुरु शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात संतप्त जमावाने आमदार श्रीनिवास मूर्ती  घराची तोडफोड केली. यावेळी जाळपोळही करण्यात आली.  या प्रकरणात आतापर्यंत 145 जणांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी पी नवीन यांना देखील अटक करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी  शहरात 144 कलम लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला. काँग्रेसचे आमदाराचा नातेवाई पी नवीन यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह फोटोवरुन वादाला तोंड फुटले. धार्मिक भावना दुखावलेला अल्पसंख्याकांच्या गटाने काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला. सायंकाळी सात वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत वातावरण अक्षरश: ढवळून निघाले होते. धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे पी नवीन यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 

पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांना दिला कोरोना मंत्र!

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस आमदार मूर्ती यांचा भाचा पी नवीन यांनी अल्लाहचे थोर प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे अल्पसंख्याक समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या. हजारोच्या संख्येने एकत्र येत अल्पसंख्याक समुदायाने काँग्रेस आमदाराच्या घराची तोडफोड केली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत संतप्त जमावाने 15 हून अधिक कार जाळल्या. पोलिस पथकावरही हल्ला करण्यात आला. यात जवळपास 60 पोलिस जखमी झाले आहेत. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे.  डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलिस स्थानकाच्या अंतर्गत कलम 144 लागू करण्यात आले आहे. 

loading image