Shivajinagar Metro Controversy
esakal
बंगळूर : राजधानी बंगळूरच्या ईशान्य भागात असलेल्या ‘शिवाजीनगर मेट्रो’ स्थानकाचे (Shivajinagar Metro Controversy) नाव बदलण्याच्या सरकारच्या प्रस्तावामुळे आता राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाला तीव्र विरोध दर्शविल्याने तर वाद आणखी वाढला आहे. शेवटी, बंगळूर महाराष्ट्रासाठी का महत्त्वाचे आहे, याविषयीही चर्चा सुरू झाल्या आहेत.