
आरसीबीच्या विजयी रॅलीवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. तर ५० जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृत्यू झालेल्या एका तरुणाच्या कुटुंबियांनी आमच्या मुलाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करू नका, त्याचा मृतदेह परत द्या अशी विनंती केलीय. यावेळी त्यांना अश्रू रोखता आले नाहीत.