Bengaluru stampede: बंगळुरुमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक जण जखमी झाले होते. आरसीबी तसंच आणखी दोन जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.