Chinnaswamy stampede
Chinnaswamy stampedeesakal

Bengaluru stampede प्रकरणात मोठे अपडेट्स, नैतिक जबाबदारी घेत दोघांचे राजीनामे

KSCA officials resign after Bengaluru stampede : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीच्या विजय सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे (KSCA) सचिव आणि कोषाध्यक्ष यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे.
Published on

KSCA Officials Step Down, Opposition Demands CM's Resignation : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चे जेतेपद पटकावले आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बंगळुरू विजय मिरवणुक काढण्याचा निर्णय घेतला. पण, तिथे सर्व गोंधळ झाला चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर राजकारण तापले, पोलिस तक्रार झाली आणि RCB च्या व्यवस्थापनातील काहींना अटकही झाली. त्यात आता कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KCA ) चे सचिव ए शंकर आणि कोषाध्यक्ष ईएस जयराम यांनी बुधवारी चेंगराचेंगरीची "नैतिक जबाबदारी" असल्याचे सांगत त्यांच्या पदावरून राजीनामा दिला आहे. राजीनामे पत्रे केएससीएचे अध्यक्ष रघुराम भट यांना सादर करण्यात आली आहेत .

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com