Bhadohi Library Privacy Breach
esakal
एका खासगी डिजिटल लायब्ररीच्या वॉशरूममध्ये विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात ही घटना घडली. याप्रकरणी मालकाच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडी सुनावली आहे. न्यू डिजिटल लायब्ररीमध्ये असं या घटनास्थळाचं नावं आहे. या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी जवळपास २८ विद्यार्थी येत होते, त्यात १२ विद्यार्थिनी आणि १६ विद्यार्थ्यांचा समावेश होता, अशीही माहिती समोर आली आहे.