लिंबूचे दर रोखण्यासाठी चक्क तंत्र-मंत्र पूजा; भगवती मंदिरात दिला बळी I Lemon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagwati Temple

सध्या बाजारपेठेपासून सोशल मीडियावर लिंबूचीच चर्चा रंगलीय.

लिंबूचे दर रोखण्यासाठी चक्क तंत्र-मंत्र पूजा; भगवती मंदिरात दिला बळी

वाराणसी : सध्या बाजारपेठेपासून सोशल मीडियावर लिंबूचीच (Lemon) चर्चा रंगलीय. यंदा लिंबूनं भाववाढीचा रेकॉर्ड ब्रेक केल्यानं बाजारपेठेत लिंबूच्या दराबाबत चिंता व्यक्त केली जात असून, सोशल मीडियावर (Social Media) महागड्या लिंबूवर विनोद केले जात आहेत. सध्या बाजारपेठेत १० ते १५ रुपयाला एक लिंबू मिळत असल्यानं केवळ उच्चभ्रू लोक लिंबू खरेदी करत आहेत.

लिंबूचे दर गगनाला भिडले असल्याने सध्या लिंबूची जोरदार चर्चा सुरूय. त्यात आता ज्या लिंबाचा वापर इतरांवरील अडथळे किंवा त्रास दूर करण्यासाठी तंत्रपूजेत केला जातो, त्याच लिंबाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता लिंबाचाच बळी दिला जात आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसीत (Varanasi, Uttar Pradesh) लिंबाच्या वाढत्या किमतींमुळं हैराण झालेल्या भगतसिंग युवा ब्रिगेडनं (Bhagat Singh Youth Brigade) आदिशक्ती मंदिरात तंत्रपूजा करत लिंबाचा बळी दिलाय.

हेही वाचा: झुकेगा नहीं साला! Allu Arjun नं धुडकावली कोट्यवधींची ऑफर

सरकारची धोरणं फसतात, प्रशासकीय कर्मचारी अपयशी होतात आणि निराश होतात, तेव्हा आपण माता राणीच्या आश्रयाला जातो. रविवारी आणि मंगळवारी तंत्रपूजा केली जाते, असं भगतसिंग युवा आघाडीचे अध्यक्ष हरीश मिश्रा सांगितलं. लिंबाचा भाव गगनाला भिडला असून तंत्र पूजेचा मुख्य घटक लिंबूच आहे. लिंबूच्या दरवाढीचा उद्रेक सर्व घराघरांत पोहोचला आहे. गेल्या महिनाभरापासून लिंबाच्या किमतीत सातत्यानं वाढ होत आहे, त्यामुळं लिंबू खरेदी करणं अवघड बनलंय. भगवती देवीसमोर (Bhagwati Temple) लिंबाचा बळी देऊन तंत्र पूजा करण्यात आली आणि येत्या २ ते ३ दिवसांत लिंबाचे दर कमी होऊ देत, अशी प्रार्थना करण्यात आली असल्याचं मिश्रांनी शेवटी सांगितलं.

Web Title: Bhagat Singh Youth Brigade Performed Worship At Bhagwati Temple To Reduce The Price Of Lemon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Uttar Pradeshvaranasi
go to top