
तंबाखूचं उत्पादन करणाऱ्या एका कंपनीनं आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी अल्लूला मोठी रक्कम ऑफर केली होती.
झुकेगा नहीं साला! Allu Arjun नं धुडकावली कोट्यवधींची ऑफर
‘पुष्पा : द राइज’ (Pushpa: The Rise) चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयानं सर्वांची मनं जिंकणारा अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच चर्चेचा विषय ठरतो; पण आता अल्लू अर्जुनच्या नावाची चर्चा एका वेगळ्याच कारणानं होताना दिसतेय. अल्लू अर्जुननं असं काही केलंय की, त्याच्या या कृतीनं सर्वांची मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत.
अल्लू अर्जुननं तगड्या मानधनाची तंबाखूची एक जाहिरात (Tobacco Advertising) नाकारलीय. त्यामुळं त्याचं नाव सगळीकडंच चर्चिलं जात आहे. पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार, तंबाखूचं उत्पादन करणाऱ्या एका कंपनीनं आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी अल्लू अर्जुनला बरीच मोठी रक्कम ऑफर केली होती. मात्र, अल्लू अर्जुननं क्षणाचाही विलंब न करता ही ऑफर नाकारलीय. यासोबतच त्यानं या मागचं कारणही स्पष्ट केलंय. ‘माझ्या चाहत्यांनी मला किंवा माझ्या जाहिराती पाहून तंबाखूचं सेवन करावं, असं मला वाटत नाहीय.’ असं त्यानं ही ऑफर नाकारताना दिलेल्या स्पष्टीकरणात सांगितलं.
हेही वाचा: T-series चे संचालक अडचणीत; बलात्कार प्रकरणी कोर्टानं फेटाळला क्लोजर रिपोर्ट
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अल्लू अर्जुन स्वतः तंबाखू किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीचं सेवन करत नाही. त्यामुळं त्यानं ही ऑफर लागलीच नाकारली. चित्रपटांमध्ये कथेची गरज म्हणून अल्लू अर्जुन सिगारेट ओढताना दिसत असला, तरीही खऱ्या आयुष्यात मात्र तो या सर्व गोष्टींपासून खूप दूर आहे. त्यामुळं तो कोणतीही जाहिरात विचार करूनच साइन करत असतो.
Web Title: Allu Arjun Turned Down A Multi Billion Rupees Tobacco Advertisement
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..