
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दिल्लीतील रुग्णालयात दाखल; दूषित पाणी प्यायले
नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना पोटाच्या संसर्गामुळे दिल्लीच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रदूषित पाणी पितानाचा व्हिडिओ समोर आला आहे. आपने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये समर्थकांच्या घोषणाबाजीत मुख्यमंत्री नदीतून पाण्याचा ग्लास बाहेर काढताना आणि ते पिताना दिसत आहेत. व्हिडिओ गेल्या रविवारचा आहे. प्रख्यात पर्यावरणवादी आणि राज्यसभा खासदार बाबा बलबीर सिंग सिचेवाल यांनी मुख्यमंत्र्यांना काली बेन नदीच्या स्वच्छतेच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यांना पंजाबमधील सुलतानपूर लोधी येथे पवित्र नदीचे प्रदूषित पाण्याचा (Contaminated Water) ग्लास भेट दिला होता. (Bhagwant Mann Latest Marathi News)
पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्र्यांनी बिनदिक्कतपणे हे पाणी प्यायले. यामुळे मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची वेळ आली आहे. आपच्या पंजाब युनिटने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये असे लिहिले आहे की, मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) सुलतानपूर लोधी येथे पवित्र पाणी पीत आहेत. गुरू नानक देव साहिब यांच्या पायाने बनवलेली भूमी. या जागेच्या स्वच्छतेची जबाबदारी घेतली आहे.’
मुख्यमंत्री मान यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोटदुखीसाठी मुख्यमंत्र्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना इन्फेक्शन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याआधी बुधवारी भगवंत मान यांनी अमृतसरजवळ सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येतील दोन संशयितांच्या हत्येनंतर राज्यातील गुंडांच्या विरोधात जोरदार हल्ला चढवला होता. त्यांचे अभिनंदन केले होते.
जगरूपसिंग रूपा आणि मनप्रीत सिंग अशी ठार झालेल्या गुंडांची नावे असून त्यांच्याकडून चकमकीनंतर एक एके-४७ आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात भगवंत मान म्हणाले की, राज्य सरकारने गुंड आणि समाजकंटकांविरुद्ध निर्णायक युद्ध सुरू केले आहे. अमृतसरमधील ऑपरेशन ही त्याचीच एक कडी आहे.
Web Title: Bhagwant Mann Punjab Chief Minister Hospitalised Delhi Drinking Contaminated Water
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..