लस वाया जाऊ नये यासाठी भारत बायोटेकनं काढला तोडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covaxin

लस वाया जाऊ नये यासाठी भारत बायोटेकनं काढला तोडगा

नवी दिल्ली : कोरोनावर देण्यात येणाऱ्या भारत बोयोटेकच्या ( Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीच्या (Covid Vaccination) अपव्ययावर तोडगा काढला आहे. आरोग्य सेवा कर्मचार्‍यांनी काळजी करू नये, तसेच लस घेण्यासाठी रुग्ण उपलब्ध नसल्यास, उघडलेली कुपी 2 ते 8°C तापमानात साठवून तिचा वापर दुसऱ्या दिवशीदेखील केला जाऊ शकतो. तसेच उघडलेली कुपी 28 दिवसांपर्यंत साठवून ठेवता येऊ शकते, अशी माहिती भारत बायोटेकतर्फे देण्यात आली आहे. (Bharat Biotech has submitted phase 3 clinical trial application to DCGI for its booster dose)

दरम्यान, भारत बायोटेकने कोवॅक्सिन आणि कोविशील्ड लसीकरण केलेल्या लोकांना त्यांच्या इंट्रानेसल कोविड लसीच्या बूस्टर डोसच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठी DCGI कडे अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत एएनआयने ट्वीट केले आहे.

कोरोना लसीचा (Corona Vaccination) दुसरा डोस दिल्यानंतर सहा महिन्यातच तिसरा डोस देण्यात यावा, असे मत भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांनी व्यक्त केले आहे. (Corona Booster Dose) नाकातून दिली जाणारी ही लस त्या सर्व नागरिकांना दिली जाऊ शकते, ज्यांना कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड यापैकी एक लस मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी बोलताना एल्ला म्हणाले होते की, कोव्हॅक्सिन दुसरा डोस नाकातून देता येतो का, हे आम्ही अभ्यासत असून हे धोरणात्मक आणि वैज्ञानिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. कारण, तुम्ही जर नाकातून दुसरा डोस दिला तर तुम्ही संसर्ग पसरण्यापासून रोखू शकता.

Web Title: Bharat Biotech Has Submitted Phase 3 Clinical Trial Application To Dcgi For Its Booster Dose

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..